गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय सेव्हन काॅम्प्लेक्समधील अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासह इतर सेलिब्रिटींच्या बंगल्यात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत महापालिकेने एमआरटीपीची नोटीस बजावली अाहे. पी दक्षिण पालिका कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन, राजकुमार हिराणी, ओबेरॉय रिअॅल्टी, पंकज बलानी, हरेश खंडेलवाल, संजय व्यास, हरेश जगतानी या सात जणांनी मंजूर आराखड्यानुसार बांधकाम न केल्याचे आढळून आले.बच्चन यांच्या वास्तुविशारदाने इमारत प्रस्ताव खात्याकडे सादर केलेले सुधारित आराखडे नामंजूर केल्याचे माहिती अधिकारात मागितलेल्या कागदपत्रांवरून समोर आली आहे. असे असतानाही बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेने कारवाई केलेली नसल्याचेही दिसून येत आहे.दरम्यान, अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र पाठवून ताबडतोब एमआरटीपी कायदा अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी करत अनधिकृत बांधकामे तोडण्याची मागणी केली अाहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews